मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याचा आदेश शासनाचे अव्वर सचिव अ.का. लक्क्स यांनी काढला आहे.
मंगळवेढा येथील दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने प्रशासकिय कारणास्तव त्यांची शिरोळ येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याचे शासनाचे अव्वर सचिव लक्कस यांनी त्या आदेशात नमूद केले असून मुख्याधिकारी प्रचंडराव हे आज शुक्रवारी कार्यभार स्विकारणार आहेत.
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची ११ ऑगष्ट २०२० रोजी मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवेढा नगरपरिषदेचे सत्ताधारी व विरोधक यांचेत समन्वय साधून अंतर्गत असणारा वाद मिटविला होता.
त्यामुळे शासनाकडून कोट्यावधी रूपयांचा निधी मंगळवेढ्याना मिळाला व अनेक कामे मार्गी लागली. मंगळवेढा शहराची सार्वजनिक स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन या प्रश्नावर भर दिला होता.
शहर स्वच्छतेबाबत मंगळवेढा नगरपरिषदेचा केंद्र शासन व राज्य शासनाने पुरस्कार देवून गौरविले आहे. या शिवाय त्यांना विविध संस्था तसेच सामाजिक संघटनांनीही विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढा येथील प्रलंबीत असलेला अतिक्रमणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
मंगळवेढा येथील कोणताही सार्वजनिक उपक्रम असला की त्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा.अधिकाऱ्याबरोबरच वक्ता, लेखक, गायक, साहित्यप्रेमी असे त्यांचे विविध पैलू मंगळवेढेकरांना पहावयास मिळाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज