टीम मंगळवेढा टाईम्स ।
बनावट बील आणि दुसऱ्याच कंपनीची केळीची रोपे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पेहे येथील विक्रेत्याविरूद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज अभिमान गायकवाड (रा. पेहे) असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नांव आहे. गायकवाड याचे सूरज कृषी केंद्ग नावाचे दुकान आहे. त्याच्याकडून करकंब येथील
सुमित्रा उत्कर्ष माने यांनी अजित सिडस् जी-९ कंपनीची १ हजार ७०० केळीची रोपे विकत घेऊन आपल्या शेतात लागवड केली होती. मात्र, नंतर त्यांना याविषयी शंका आल्याने त्यांनी संबंधित कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन विष्णू भोसले (रा.कंदर, ता. करमाळा) यांच्याशी संपर्क साधला.
त्यानुसार भोसले यांनी करकंब येथे येऊन माहिती घेतली असता सदर कंपनीचे बील त्यांना माने यांनी दाखविले.
याबाबत त्यांनी कंपनीकडे चौकशी केली असता सदर बील बनावट असल्याचे तसेच गायकवाड याने कंपनीकडून रोपेच मागवली नसल्याचे समोर आले.
गायकवाड याने माळशिरस तालुक्यातही अशा प्रकारे कंपनीची बनावट बिले व दुसऱ्याच कंपनीची रोपे देऊन ती जी-९ कंपनीची असल्याचे भासवत फसवणूक केल्याप्रकरणी अगोदर गुन्हा नोंद झालेला आहे.
तसेच पंढरपूर तालुक्यात अन्यही काही शेतकऱ्यांना फसविले आहे, अशा आशयाची फिर्याद नितीन भोसले यांनी दाखल केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज