टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे सार्वजनिक रोडवर आपापसात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अजय भारत घुले ( वय २३ ) , समाधान पांडुरंग जाधव ( वय २६ ) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मरवडे येथे पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके हे निर्भया वाहनातून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या डॉक्टरच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याकरिता मरवडे गावी आले असता त्यावेळी सार्वजनिक रोडवर दोघे आरोपी आपापसात हाणामारी करून शांततेचा भंग करीत असल्याचे निदर्शनास आले.
याची फिर्याद पोलीस शिपाई सोमनाथ माने यांनी दिल्यावर दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार सुनील गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत .
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज