टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना हरकतीनंतर प्रभाग क्रमांक 1 वगळता 2 ते 10 प्रभागांमध्ये बदल करून प्रसिद्ध करण्यात आली असताना काल प्रभाग रचनेचे आरक्षण निश्चित करण्यात आले त्
यामध्ये प्रभाग 3 अ आणि प्रभाग 10 ब हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आज नगरपालिकेमध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत प्रभाग रचनेची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली.
या प्रभागातून 20 नगरसेवक निवडले जाणार असून त्यामध्ये 50 टक्के महिलासाठी आहेत.
प्रत्येक प्रभागातून एकेक महिला निवडली जाणार आहे प्रभाग क्रमांक 3 ब हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी तर प्रभाग 10 ब अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव राहिला यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय
या निवडणुका होणार असल्यामुळे यापुढील काळात नगरपालिकेत ओबीसी प्रवर्गाचा नगरसेवक नसणार आहे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे 3 सदस्यांची वाढ झाली.
त्यामध्ये प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,सोमनाथ माळी, आणि प्रतीक किल्लेदार यांनी प्रभाग रचनेवर हरकती नोंदवतांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग तयार करण्यात आले नसल्याबाबत त्यांनी हरकती दिल्या.
त्या हरकतीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यामध्ये बदल करण्याबाबत लक्ष घातले त्यानुसार हे बदल करण्यात आला.
त्यामुळे पालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज्यातील सत्तेचा फायदा झाल्याने भविष्यात हा बदल फायदेशीर होऊ शकेल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नाराज गटाबरोबर विद्यमान आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
त्यामुळे त्यांची गणिते या पुढील काळात देखील महत्त्वाची ठरणार आहेत. सरासरी 2182 लोकसंख्या गृहीत धरून नव्या निकषाप्रमाणे तयार झालेल्या प्रभागातील एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती लोकसंख्या व अ.जमाती लोकसंख्या आणि प्रमुख ठिकाणी पुढील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक 1 लोकसंख्या 2284,अ.जा.144 अ.ज 5 उजनी वसाहत कृष्ण नगर नागणेवाडी झोपडपट्टी,
प्रभाग 2 लोकसंख्या 2303, अ.जा.205,अ.ज.4 होलार वस्ती, दुर्गामाता नगर ,दामाजी मंदिर, मुलाणी गल्ली, मुरडे गल्ली
प्रभाग 3 लोकसंख्या 2203,अ.जा.994 अ.ज.19 साठेनगर, ग्रामीण रुग्णालय, अवताडे वखार, दूरदर्शन परिसर,खंडोबा गल्ली
प्रभाग 4 लोकसंख्या 2137 अ.जा.213 अ.ज.23 बत्ती चौक, रोहिदास गल्ली,गुंगे -घुले गल्ली, चांभार गल्ली,
प्रभाग 5 लोकसंख्या 2255,अ.जा.15,अ.ज.13 मुढे गल्ली, सुतार गल्ली, मारवाडी गल्ली, मुजावर गल्ली, चोखामेळा चौक,
प्रभाग 6 लोकसंख्या 2354 अ.जा.65 प्रांत कार्यालय,किल्ला भाग, महादेव मंदिर, मेटकरी गल्ली
प्रभाग 7 लोकसंख्या 2218 अ.जा.66 अ.ज.1 सनगर गल्ली, बेरड गल्ली, शिवाजी तालीम,बुरुड गल्ली
प्रभाग 8 लोकसंख्या 2021, गल्ली,कौडूभैरी गल्ली,होनमाने गल्ली, भगरे गल्ली, माळी गल्ली,
प्रभाग 9 लोकसंख्या 2155 अ.जा.31 अ.ज.20 मंडई परिसर, न्हावी गल्ली, जगदाळे गल्ली, हजारे गल्ली, गैबीपीर दर्गा
प्रभाग 10 लोकसंख्या 1897 अ.जा.896 अ.ज.105 नगर,सराफ गल्ली,कोळी गल्ली,बोराळे नका.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या मागील सत्ताधारी यांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपला आहे. सध्य स्थितीत पालिकेत प्रशासक कार्यरत आहेत. तरी सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. असे बोलले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज