कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटख्याचा टेंपो पोलिसांनी पकडून टेंपोसह 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सुनिल भारत वायभसे (वय 30 रा. दापोली),निलेशकुमार बन्सीलाल बाहोती(वय 30 रा.नागरगाव ता. शिरूर,पुणे) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी,कर्नाटक राज्यातून एम एच 42, एक्यू 5569 या टेंपोमधून 13 हजार 552 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा,49 हजार 920 रुपये किमतीचा विमल पान मसाला,13728 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू,57 हजार 600 रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला,24 हजार रुपये किमतीची एम सुगंधी तंबाखू, 1 लाख 21 हजार 968 रुपये किमतीचा विमल पान मसाला मोठा असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
:- ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही : राजू शेट्टी
दि. 22 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा भरून त्याची अवैधरित्या वाहतूक वरील आरोपी सोडडी गावच्या शिवारातून करीत असताना पोलिसांना मिळून आले.याची फिर्याद पोलिस शिपाई अभिजीत साळुंखे यांनी दिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन संपल्यानंतर कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात गुटखा मंगळवेढयात येत आहे.त्याचबरोबर बेकायदा शस्त्रे,अफू,गांजा याचीही तस्करी होत असल्याची चर्चा आहे.
मंगळवेढयापासून केवळ 20 कि.मी.अंतरावर कर्नाटकची सीमा आहे. कर्नाटक राज्यात गुटखा खुला असल्याने येथील व्यापारी तेथे जावून खरेदी करून चोरटया मार्गाने मंगळवेढयात प्रवेश करीत आहेत. ही सर्व तस्करी रोखण्यासाठी मंगळवेढा सीमेवर चेक आऊटपोस्ट गरजेचे आहे.नूतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कामी लक्ष घालून सीमेवर चोख बंदोबस्त नेमावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज