मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉल तिकीटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
तर हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.
परिणामी, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिक्षण मंडळाकडून दिलगिरी, विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट
पुढे आलेल्या माहितीनुसार दहावीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आता काढण्यात आला आहे. परीक्षेसाठीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा (कास्ट कॅटेगरी) उल्लेख करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून करण्यात आला होता.
मात्र सर्व स्थरातून होत होत असलेल्या या निर्णयासंदर्भातील टीकेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त करत हा निर्णय रद्द केला आहे. आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.
तर राज्यात 11 फेब्रुवारीपासून बारावीची(एचएससी) तर 21 फेब्रुवारीपासून दहावी (एसएससी) बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे.
त्या अनुषंगाने हॉल तिकीट ऑनलाईन डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता नव्याने हॉल तिकीट उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यावर जातीच्या प्रवर्गाचा (कास्ट कॅटेगरी) उल्लेख केला जाणार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती, बोर्डाकडून आयोजन
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात त्या अनुषंगाने येत्या 20 ते 26 जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताहाचे बोर्डाकडून आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 21 जानेवारीला दहावी आणि बारावी बोर्डाचे सर्व विद्यार्थी परिपाठावेळी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कॉपीमुक्त अभियान दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी बोर्डाकडून राबवण्यात येत आहे. या सगळ्याच्या जनजागृतीसाठी 20 ते 26 जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताह आयोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक किंवा कॉलेज चे प्राचार्य हे या जनजागृती अभियान राबवण्यासंदर्भात आणि अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना पहिल्या दिवशी करतील. तर विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यास कोणत्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागणार याची जाणीव शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतील.
या शब्दात कॉपीमुक्त घोषवाक्यसह शाळा परिसरात जनजागृती फेरी सुद्धा काढली जाईल. त्यानंतर सर्व विद्यार्थी कॉपीमुक्त अभियानासाठी शपथ घेणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज