टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रेमविवाह केल्याने तुइया मुलीने आमची बदनामी केली असून तू येथे रहायचे नाही तु तीला साथ का देते असे म्हणून राहत्या घरात घुसूने पती पत्नीस शिवीगाळ करीत
मारहाण केल्याप्रकरणी नंदा अंबादास बेंद्रे, सारिका नंदू बेंद्रे, सागर अंबादास बेंद्रे, श्रावण महेश बेंद्रे, अनंता आदेश बेंद्रे या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी मिना भागवत बेंद्रे (वय 45 रा.शनिवार पेठ) ह्या सायंकाळी 5.00 वा. त्यांचे पती भागवत हे दोघे घरी असताना
त्यांच्या शेजारील व भावकीतील नंदा अंबादास बेंद्रे, सागर अंबादास बेंद्रे, सारिका नंदू बेंद्रे, श्रावण महेश बेंद्रे, अनंता आदेश बेंद्रे या सर्वानी मिळून येवून
फिर्यादीस तु येथे रहायचे नाही, तुइया मुलीने प्रेमविवाह करून आमची बदनामी केली आहे.
तु तीला साथ का देते असे म्हणून फिर्यादी व तीचे पती भागवत यास शिवीगाळ करू लागल्यानंतर फिर्यादी शिवीगाळ करू नका असे म्हणत असताना आरोपीने राहते घरात घुसून आम्हास मारहाण करून
तुम्ही येथे रहायचे नाही, तुम्हाला व प्रेमविवाह केलेल्या मुलीस आम्ही सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज