टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले पैसे परत मागितले असता एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी
मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक श्रीकृष्ण शंकर घंटे याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी निशाताई शशिकांत धुमाळ (रा.पंढरपूर ) यांच्या मुलीला कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचे
अमिष दाखवून मोठया आकडयात आरोपीने पैसे घेतल्याचे तक्रारीत नमुद केले आहे . बराच कालावधी उलटूनही नोकरी न लावल्याने फिर्यादी व फिर्यादीच्या पतीने दि . ७ रोजी सकाळी ९ .३० वा
मंगळवेढा येथील शासकिय गोडाऊनजवळ आरोपी कृष्ण घंटे याला बोलावून घेवून दिलेल्या पैशाची मागणी केली असता त्याने सदरचे पैसे देणार नाही असे म्हणून शिवीगाळी , दमदाटी , पती पत्नीला केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे जिल्हयात चांगले काम करीत असताना
कर्मचारी मात्र बेलगाम वागून खात्याला बदनाम करीत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया असल्याने याघटनेवर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे आता काय कारवाई करणार याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज