टीम मंगळवेढा टाईम्स । आर.पी.आय.चे माजी जिल्हाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे (वय.55 रा.मोडनिंब) यांना वारंवार पैशाबाबत मागणी करून त्यांना धमकावून मानसिक त्रास देवून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी,
जयंत विठ्ठल ओहोळ,सोमनाथ बाळू साखरे,दिपक बलभिम पवार(रा.सर्व मोडनिंब),बाळासाहेब भैरू क्षिरसागर,विजय हावळ (रा.इचलकरंजी) या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील मयत कुमार वाघमारे हे मूळचे मोडनिंब येथील राहणारे असून मंगळवेढा एम.आय.डी.सी.परिसरात तुळजाभवानी औद्योगिक संस्था आहे.या कारखान्यात पुठ्ठे व बॉक्स तयार केले जातात.
यातील मयत कुमार वाघमारे यांना वरील पाच आरोपीनी गेले चार पाच वर्षापासून संस्थेच्या व इतर कामानिमित्त मयताच्या घरी येवून पैसे मागत होते.तसेच त्यांना धमकी देवून मानसिक त्रास देत होते.
गेल्या एक वर्षापासून जास्तच त्रास देत असल्याने त्रासाला कंटाळून दि.15 ते 19 सप्टेंबरच्या रात्री एम.आय.डी.सी.तील संस्थेच्या कार्यालयात पेटवून घेवून आत्महत्या केली असल्याचे मयताचा मुलगा विक्रांत वाघमारे (वय.20) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत.
Case filed against five persons for causing suicide of Kumar Vitthal Waghmare
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज