कोरोनाने जगभरात थैमान घातले असतानाच रशिया आणि ब्रिटनमध्ये नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मात्र, या लसीचा प्रभाव राहण्यासाठी आणि तो दीर्घकाळ टिकवण्यासाठी लसीचा डोस घेतल्यानंतर नागिरकांनी दोन महिने मद्यपान करू नये, अशी सूचना रशियाच्या आरोग्य विभागाने केली आहे.
रशियाने विकसीत केलेली स्फुटनिक व्ही या कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतर नागरिकांनी दोन महिने दारू पिऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. न्यू यॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर 42 दिवस सुमारे दोन महिने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन रशियाचे उपपंतप्रधान टॅटिना गॅलिकोवा यांनी केले आहे.
दोन महिन्यानंतर या लसीचा प्रभाव दिसतो. त्यानंतर कोरोना संक्रमणापासून बचाव होतो, असे त्यांनी म्हटले आहे.स्फुटनिकची लस घेतल्यानंतर दोन महिने मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लोकांशी संपर्क टाळणे आणि महत्त्वाचे म्हणजे लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यपान करू नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
या सर्व गोष्टींचे पालन केल्यास दोन महिन्यानंतर लसीचा प्रभाव दिसण्यास सुरुवात होते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यपान करू नये, असे रशियाच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी सांगितले.
रशिया अल्कोहोल घेणाऱ्यांच्या संख्येत जगात चौथ्या स्थानावर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. रशियात मास्कोमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरवात झाली आहे.
स्फुटनिक व्ही लस सुमारे 90 टक्के प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, कोरोना लस घेतलेल्या काही आरोग्यसोवकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त होते. मात्र, राष्ट्रपती ब्लादिमेर पुतीन यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.
रशियाच्या स्फुटनिक लसीच्या प्रभावाबाबत अनेक संशोधकांनी साशंकता व्यक्त केली आहे. लस दिल्यानंतर कितीजणांवर याचा प्रभाव दिसून आला.
याबाबतची कोणतीही माहिती रशियाने दिली नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, लस घेतल्यानंतर दोन महिने खबरदारी घेण्याच्या सूचना रशियाच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत.(सामना)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज