mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा CAITचा निर्णय ; वाचा काय आहे यादी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा CAITचा निर्णय ; वाचा काय आहे यादी

मंगळवेढा टाईम्स टीम । लडाख सीमेवर (Ladakh Border) वर भारत-चीन संघर्षामुळे (India-China Rift) व्यापारी संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने देशामध्ये चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता CAIT ने 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी जाहीर केली आहे. लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापाऱ्यांनी टीकी केली आहे. चीनला संधी मिळाल्यावर ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. गलवान खोऱ्यात (galwan valley) सुरू झालेला हा सीमा वाद आता दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडवू शकतो.CAIT’s decision to boycott Chinese products, read the list

भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

चीनची भूमिका देशहिताविरोधात असल्याने CAIT ने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कॅटने ‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ या अभियानाअंतर्गत 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 3000 पेक्षा जास्त उत्पादकांचा समावेश आहे, जे चीनमध्ये तयार होतात आणि भारतात आयात केले जातात.

या अभियानाच्या पहिल्या चरणात कॅटने या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. या 500 कॅटेगरीमध्ये समावेश असणाऱ्या 3000 वस्तूंमध्ये रोजच्या वापरातील वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, गारमेंट, स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, लगेज, हँड बॅग, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अपॅरल, खाण्याच्या काही वस्तू, घड्याळं, काही प्रकारचे दागिने, वस्त्र, स्टेशनरी, कागद, फर्नीचर, लायटिंग, हेल्थ प्रोडक्ट्स, पॅकेजिंग प्रोडक्ट, ऑटो पार्ट्स, यार्न, फेंगशुई आयटम्स, दिवाळी तसंच होळीसाठी लागणारं सामान, चश्मा, टेपेस्ट्री मटेरियल यांचा समावेश आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी कॅटचे हे अभियान स्पष्ट केले आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, चीनमधून वार्षिक 5.25 लाख कोटी अर्थात 70 बिलियन डॉलरची आयात केली जाते. सुरूवातीच्या टप्प्यात 3000 वस्तूंवर बहिष्कार टाकला जाणार आहे. या वस्तू भारतात देखील बनतात मात्र चीनच्या वस्तू अधिक स्वस्त असल्याने त्यांची आयात केली जाते. भारत या वस्तुंवर चीनवर अवलंबता कमी करू शकतो. चीनमध्ये बनणाऱ्या वस्तू भारतात आयात होऊ नये हे या अभियानेचे उद्दिष्ट असल्याचे खंडेलवाल म्हणाले. कॅट हा विषय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यापुढे मांडणार आहे आणि या वस्तू भारतात निर्मित करण्यासाठी सरकारने देशातील लघू उद्योग, स्टार्टअप आणि अन्य उद्योगांना मदत द्यावी याकरता आग्रह देखील करणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान,करण जोहरसह ८ जणांविरोधात खटला दाखल

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान,करण जोहरसह ८ जणांविरोधात खटला दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा