mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरात मुलीच्या विवाहासाठी गेल्यावर घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 30, 2020
in क्राईम, सोलापूर
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मुलीचा विवाह परगावी असल्याने सर्वजण घर बंद करून गेले होते. लक्ष्मीनारायण बिल्डिंग, बुधवार पेठ, सोलापूर येथील घरात चोरट्याने चोरी केली.

चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गोविंद लक्ष्मीनारायण राठी, नीलेश बालमुकुंद असावा, नंदकिशोर बालमुकुंद असावा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी दत्तात्रय शंकरराव दंडगल यांच्या मुलीचा विवाह 22 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे होता. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हैदराबादला गेले होते.

विवाह उरकून सर्वजण पहाटे दोन वाजता घरी आले. त्या वेळी पार्किंगमध्ये लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा गायब असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ते घरात गेले आणि “डीव्हीआर’ सीसीटीव्ही फुटेज पाहिले.

त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून चौथ्या मजल्यावरील खोलीचे कुलूप तोडून चोरटे घरात आल्याचे दिसले.

त्यानंतर चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह टीव्ही, सायकल, लोखंडी टेबल, खुर्च्यांसह इलेक्‍ट्रॉनिक टूलबॉक्‍स, सोफासेट, शैक्षणिक कागदपत्रे, प्रिंटर, स्कॅनर, दोन हजार शंभर रुपये रोख, ड्रॉइंग किट, दोन पासपोर्ट फोटो, असा मुद्देमाल चोरून नेला, असेही दंडगल यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. भोईटे हे करीत आहेत.

विजयनगर सोसायटीतील घर फोडून चोरट्याने पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

विजयपूर रोडवरील विजयनगर सोसायटीतील घर फोडून चोरट्याने पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

सुहास नारायण जोशी (रा. विजय सोसायटी, दंतकाळे हॉस्पिटलमागे) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, घरातील सर्वजण जेवण करून दरवाजा बंद करून झोपले. त्या वेळी घराचा दरवाजा उघडून चोरट्याने घरात प्रवेश केला. जोशी यांच्या घरातून पावणेचार लाखांचे दागिने लंपास केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. बेंबडे हे करित आहेत.

आयुक्‍तांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांचीच बगल

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांसह मास्क न घालणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सफाई अधीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळही देण्यात आले आहे.

तत्पूर्वी, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मास्क न घालणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचे आदेश देऊनही काहीजणांकडून शंभर रुपये तर काहीजणांकडून पाचशे रुपयांचा दंड घेतला जात असल्याचे चित्र आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: घरफोडीसोलापूर

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post

भारत नानांची 'ही' दोन स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली : जलसंपदामंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा