mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुशखबर! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची बंपर भरती; उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2023
in शैक्षणिक, सोलापूर
मंगळवेढ्यातील ‘या’ सरपंचाला शाळेत शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ; आमदार साहेब येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून डोळे पुसण्याचा केला प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स।

जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ७०० शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाकडून जिल्हा परिषद शाळांची बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अपलोड केली जाणार आहे.

त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार असून अंतिम टप्प्यात मेरिट यादीनुसार ही भरती होईल.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार ७९५ शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेआठ हजारांपर्यंत शिक्षक आहेत, पण पटसंख्येच्या तुलनेत अद्याप शिक्षकांची संख्या कमीच आहे.

जवळपास सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जास्त अन्‌ शिक्षक कमी अशी स्थिती आहे.

आता राज्य सरकारने ३२ हजार शिक्षक भरती जाहीर केली आणि सर्व जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने तपासून अंतिम केली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ६२० पदे तर उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये ५८ आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्येही जवळपास ३० पदांची भरती होणार आहे.

पण, आंतरजिल्हा बदलीमुळे परजिल्ह्यातील काही शिक्षक सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे हा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित जागांवर नवीन शिक्षकांची भरती होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गाची पदे रिक्त आहेत ही माहिती आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हद्दवाढ भागातील शाळांचे लवकरच समायोजन

सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात जिल्हा परिषदेच्या ३७ शाळा असून त्यातील महालक्ष्मी नगर व सलगरवाडी येथील शाळा पटसंख्येअभावी गतवर्षी बंद पडल्या आहेत.

आता उर्वरित ३५ पैकी कमी पटसंख्या असलेल्या काही शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पटसंख्या कमी असतानाही त्याठिकाणी जास्त शिक्षक कार्यरत आहेत. त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळांमध्ये नेमणूक दिली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.(स्रोत:सकाळ)

संवर्गनिहाय रिक्त पदे (मराठी माध्यम)

जात संवर्ग भरती होणारी पदे

एसटी ४३०, एससी ५२, ओबीसी ४२, खुला ३४, ईडब्ल्यूएस ६२

एकूण ६२०

उर्दु माध्यम रिक्त पदे

एसटी १८, एससी ५, एनटी-ब ६, एनटी-क ९, एनटी-ड ५, एसबीसी ५ खुला १०

एकूण ५८

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिक्षक भरती

संबंधित बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात माजी सैनिकाच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण; पती,पत्नी विरुध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात माजी सैनिकाच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण; पती,पत्नी विरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..