टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी काॅपर वायरचे दुकान फोडण-या गुन्हेगार टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून 11 घरफोडी चोरींच्या गुन्हयांची उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.
दि.9 जुन 2022 रोजी रात्री 10 वा. ते दि.11 जून 2022 रोजी सकाळी 4 वा चे दरम्यान साई कृषीसेवा केंद्र मौजे शेलगांव वांगी ता. करमाळा येथील दुकानांची लोखंडी शटर उचकटून आतमध्ये प्रवेष करून,
सबमर्शिबल मोटारीचे 4 काॅपर केबल बन्डल, 1 लॅपटाॅप, लहान काॅपर बन्डल, 2 मोबाईल असा एकूण 1,05,800 रू. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दामुन व लबाडीने घरफोडी चोरीकरून नेले म्हणून राहूल तुकाराम यादव, वय 27 वर्ष, रा. वांगी नंबर 2 ता. करमाळा यांनी
अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने
करमाळा पोलीस ठाणे गुरनं 444/2022 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मागील काही महिन्यापसून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये
काॅपर वायरचे दुकानाचे शटर उचकटून काॅपर वायर व मोटार चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, यांना काॅपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले यांचे पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.
सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले व त्यांचे पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
सवतगव्हाण ता. माळशिरस व अकलुज शहरामध्ये काॅपर वायरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची टोळी कार्यरत असून ते गुन्हे करण्यासाठी अकलुज शहरातील पीकअप वाहनाचा वापर करत असल्याबाबत माहिती मिळाली.
सदर गुन्हयाचे तपासकामी पथक अकलुज भागात असताना, टोळीतील एक सदस्य अकलुज शहरातील जुना बसस्टॅन्ड समोरील चहा टपरीवर थांबला असल्याबाबत माहिती मिळाली.
त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने सांगितले की, त्याने त्याचे इतर सवतगव्हाण येथील साथीदार यांनी मिळून
मागील काही महिन्यांपासून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी ठिकाणी रात्रीचे वेळी साथीदारासह वाहनांमध्ये जावून काॅपर वायरचे दुकानाचे शटरचे कुलपे व शटर उचकटून
दुकानातील दुकानातील काॅपर वायरचे केबल बन्डल व काॅपर वायर, मोटार इत्यादी साहित्याची चोरी केल्याचे सांगितले आहे. त्यावरून इतर साथीदारांचा शोध घेत असताना, गुन्हयात वापरलेले वाहन व त्याचा साथीदार या दोघांची माहिती काढून त्यांना ही गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे.
त्यांचेकडून एकूण 530 किलो वजनाचे काॅपर वायर, 1 मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले पीकअप बुलेरो वाहन असा एकूण 12,26,742 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपीतांकडे तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांचेकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.
करमाळा, टेंभूर्णी, कुर्डूवाडी, वेळापूर , पंढरपूर शहर , मोहोळ , नातेपुते, सांगोला येथे विविध गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोसई शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे,
मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, शिवाजी घोळवे, प्रकाश कारटकर, मनोहर माने व करमाळा पोलीस ठाणेचे तपासिक अंमलदार चेतन पाटील, अकलुज पोलीस ठाणेचे सुहास क्षिरसागर यांनी बजावली आहे.
करमाळा पोलीस ठाणे गुरनं 444/2022 भादवि कलम 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेले व फरार आरोपींची नांवे:-
1) अमोल शंकर पवार, वय 22 वर्ष , रा. सवतगव्हाण ता. माळशिरस जि. सोलापूर. ( अटक )
2) दिगंबर रामहरी माने, वय 32 वर्शे, रा. इंदिरा घरकुल, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर. ( अटक)
3) शशिकांत रोहीदास पवार, वय 23 वर्ष, रा. जुना बैलबाझार अकलुज, ता. माळशिरस जि. सोलापूर ( अटक )
4)विजय उर्फ विजू राजू काळे, रा. बाबरी पूल म्हाळुंगषिवार अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)
5) गोपी विजय चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)
6) दत्तु श्यामा चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)
7) सुरेश राजू चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज