टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात विविध ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी तानाजी बसाप्पा कोळी (शनिवार पेठ), किसन धोंडीराम जाधव (शिवाजी तालीम , मंगळवेढा), अरिफ बशीर बागवान या तीन व्यापाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हयात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आदेश करण्यात आले आहेत.
वरील आरोपींनी विविध ठिकाणी भाजी विक्री करण्यास बसून तेथे गर्दी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिस शिपाई सोमनाथ माने , कैलास खटकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दि. २३ रोजी सकाळी १२.१५ वा. हे सर्व आरोपी सांगोला नाका ते डोंगरगाव रोडवर गर्दी करून भाजी विकत असल्याचे उघड झाले आहे.
३१ मे नंतर सोलापुरातील लॉकडाऊन शिथिल करा
३१ मे नंतर सर्व व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करायला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे राज्यात लॉकडाउन लावल्यापासून अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे . त्या पार्श्वभुमीवर ही मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्रात सुरु झालेल्या लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार वगळून अन्य सर्व व्यापार बंद राहिल्याने राज्यातील व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडले आहेत.
गुढी पाडवा , अक्षयतृतीया , ईद हे महत्वाचे सण लॉकडाउन असल्याने व्यापाराविना गेल्याने व्यापार क्षेत्राला या फटका बसणार आहे.
व्यापारी क्षेत्र तब्बल २ महिन्याच्या लॉकडाउनमुळे अत्यंत अडचणीत आले असून आता व्यापाऱ्यांनी काहीही उत्पन्न नसताना १/२ महिने कर्मचाऱ्याचे पगार दिले परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना घरबसून पगार देणे अशक्य झाले आहे तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे.
पर्यायाने बेरोजगारी वाढत आहे व्यापारी , कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी दयावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आणि सहकार्याची गरज आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज