टीम मंगळवेढा टाईम्स ।
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर तसेच साठ वर्षांच्या पुढील नागरिकांसोबत आता सोलापूर जिल्ह्यातील अठरा वर्षांपुढील नागरिकांनाही वूस्टर डोस दिला जाणार आहे.
आज सोमवार, ११ एप्रिलपासून वूस्टर डोस देण्यात येणार असून यासाठी २६ लाख नागरिक पात्र राहतील.
बूस्टर अर्थात प्रिकॉशन डोसचे लसीकरण वेगाने करण्यासाठी ग्रामीण भागात शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे वाढविल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधकाचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिले जात आहे.
पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर तसेच फ्रंटलाइन वर्कर आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर डोस दिले जात आहे.
आता बूस्टर डोसचा दुसरा सोमवारपासून प्रारंभ होणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील २६ लाख नागरिक बूस्टर डोसचे लाभार्थी राहतील.
आतापर्यंत ४२ हजार ४१४ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी फक्त नऊ हजार ७१४ कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. ७९ हजार ३१५ वर्कर्सपैकी आठ हजार २९४ वर्कर्सनी बूस्टर डोस घेतला आहे.
यास अल्प प्रतिसाद मिळत असून पुढील काळात ही संख्या वाढविण्यासाठी ग्रामीण भागात १०० केंद्रे हून अधिक लसीकरण वाढविल्याची माहिती डॉ.पिंपळे यांनी दिली आहे.(स्रोत:लोकमत)
सव्वातीन लाख डोस शिल्लक
सध्या सोलापुरात कोविशिल्डच्या अडीच लाख लसी शिल्लक आहेत. त्यासोबत कोव्हॅक्सिंगच्या ४० हजार, कोर्बे व्हॅक्सिंगच्या ३२ हजार लसी शिल्लक आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज