मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मनोज जरांगे यांच्या आंदोलनादम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले. जरांगे यांनी मुंबई वेठीस धरली आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते तसेच अन्य लोकांनी जरांगेंच्या या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच जरांगे यांचे उपोषण थांबवावे अशीही मागणी करण्यात आली होती. सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना एका प्रकारे दिलासाच मिळाल्याचे म्हणाले लागेल.

जरांगे यांच्या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आज सुनावणी घेतली. न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 सप्टेंबर रोजीदेखील याच प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत.

30 आणि 31 ऑगस्ट रोजी आंदोलनाची परवानगी नाही
आजची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश देण्याअगोदर राज्याच्या महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली. जरांगे यांच्या आंदोलनात सर्व नियम मोडण्यात आले आहेत. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी सरकारने आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती, असेही सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.

तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील जरांगे यांचे उपोषण लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी केली. तर जरांगे यांनी आतापर्यंत कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन केलेले आहे, असा दावा जरांगेंची बाजू मांडताना करण्यात आला. दरम्यान, या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने नेमके काय निर्देश दिले?
या प्रकरणावर 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले. आंदोलकांना जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असेल असे न्यायालयाने सांगितले. उपोषणादरम्यान जरांगे यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.

नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते अशीही सूचना न्यायालयाने सरकारला दिली. पण ही परावनगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश म्हणजे मराठा आंदोलकांसाठी एका प्रकारचा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
जरांगेंचा आंदोलनाचा अधिकार ठेवला कायम
कोर्टाने जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आदेश द्यावेत म्हणून राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. मात्र न्यायालयाने या प्रकरणी आपले जुनेच आदेश जैसे थे ठेवले असून जरांगे यांचा आंदोलनाचा अधिकार कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













