देवानंद पासले । भैरवनाथ शुगरचा ७ वा गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर सुरू करत असून कारखान्याच्या उभारणीपासून या तालुक्यातील व आसपासच्या भागातील शेतकर्यांनी आतापर्यंत विश्वास दाखवला असून त्याच विश्वासावर या कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर वर्क्स लि.कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर चे अग्नि प्रतिपादन करण्यात आले.
प्रारंभी श्री.श्रीपती माने (सरकार) व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.चंद्रप्रभा या उभयतांच्या हस्ते बॉयलरची पुजा करण्यात आली तसेच श्री.चंद्रकांत देवकर व सौ.ज्योती या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणची पुजा करण्यात आली.
या प्रसंगी व्हा.चेअरमन अनिल सावंत, एक्झ्युकेटीव डायरेक्टर मा.अविनाश वाडेकर, विहाळ युनिटचे कार्यकारी संचालक किरण सावंत, वाशी युनिटचे कार्यकारी संचालक केशव सावंत, आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथवीराज सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर पोकळे, प्रोसेस मॅनेजर पोरे, एचआर मॅनेजर राठोड, इलेक्ट्रीकल इंजि कोरे, केण यार्ड पाटील,अनिल खंदारे,अभिजीत पवार,इर्शाद पाटील,प्रकाश कमले,दत्तात्रय गाडे,नवनाथ चव्हाण,राहुल पवार,प्रमोद भोसले,देवानंद पासले,संतोष आवतडे,रविराज थिटे,दिलीप गायकवाड,गोपाळ भोसले,अशोक निकम,राहुल जरे व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक मा.आ.डॉ.तानाजीराव सावंत (माजी जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.
या दुष्काळी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या भागातील शेतकर्यांचा व गावांचा आर्थिक व्यवहार चांगला होत आहे त्यामुळे कारखाना परिसर व आसपासच्या गावचा साखर कारखान्यामुळे विकास होऊ लागला आहे.
चालू गळीत हंगामामध्ये ६ लाख मे.टन गळपचे उदीष्ट असून शेतकर्यांनी जास्तीत जास्त उसाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी वाहतूकदार,तोडणी कामगार,अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंढरपूर येथील शाम गोगाव,संदीप तापडिया, सलगरचे सरपंच बंडू जाधव, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, शशिकांत निकम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Boiler Pujan of Bhairavnath Sugar at Lavangi Chairman Prof. Shivajirao Sawant
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज