टीम मंगळवेढा टाईम्स।
भैरवनाथ शुगर लवंगी येथे उद्या बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभ गुरुवारी दुपारी 12.25 मिनीटांनी संपन्न होणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे.
बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभ धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
कारखान्याचे संस्थापक आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.
येणार्या सन २०२२-२३ च्या गळीत हंगामाची जय्यत तयारी झाली आहे. कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व मेंटनन्स इत्यादीचे सर्व कामे झाली आहेत.
तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे. त्याच बरोबर त्यांना येणार्या गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही दिलेली आहे.
येणार्या गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून त्यानुसार ऊस नोंदीचे काम ही जवळपास पूर्ण केले आहे.
ज्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाची नोंद कारखान्याकडे देण्याची राहिली असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून ऊस नोंदी द्याव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज