टीम मंगळवेढा टाईम्स।
आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार करून माणसातील खऱ्या देवाचे दर्शन जनतेला करून देणारे आणि संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे प्रखर संत सदगुरू बागडे बाबा यांची 31 व्या पुण्यतिथी निमित्ताने
मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर आज शुक्रवार दि.29 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती श्री.संत सदगुरू बागडे महाराज भक्त आश्रमचे उत्तराधिकारी ह.भ.प संदेश भोसले महाराज यांनी दिली आहे.
रक्तदान करण्यासाठी आवाहन
आज सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आज दुपारी 12 वाजता संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
पुष्पवृष्टी झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.संत सदगुरू बागडे महाराज भक्त आश्रमचे उत्तराधिकारी ह.भ.प संदेश भोसले महाराज यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज