टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वार आज मंगळवार दि.11 ऑगस्ट रोजी युटोपीयन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स येथे रक्तदान शिबिर संपन्न @Dev_Fadnavis @DeshmukSubhash @BJP4Maharashtra pic.twitter.com/xNBBnHse9K
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 11, 2020
या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजीराव माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी उपस्थित होते.सदर च्या शिबिरात १०१ रक्त दात्यांनी सहभाग घेतला होता. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर स्वछ वातावरणात, व गर्दी टाळत सोशल डिस्टिंग्शनचे पालन करीत या शिबिराचे आयोजन केले होते.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्त दान हे श्रेष्ठ दान असल्याने तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून राज्यात दररोज पाच हजार लोकांना रक्ताची आवश्यकता असते.
कोरोंना मुळे नियमित चालणार्या रक्त दान शिबिरांना फटका बसला असल्याने राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आली असून अशा प्रकारचे शिबीर आयोजित करणे हा अत्यावश्यक उपक्रम असून अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन युटोपियन शुगर्स प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच रक्त दात्यांचे आभार मानले.
रक्तदान केलेल्या व्यक्तींना स्यानीटाईजर,हेलमेट,पाण्याचे जार या सारख्या वस्तु भेट म्हणून देण्यात आल्या. सदर रक्त-दान शिबीर प्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी सदिच्छा भेट देऊन शिबिराची पाहणी केली व आभार व्यक्त केले.
Blood donation camp at Utopian Sugars on the occasion of Prashantrao Paricharak’s birthday
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज