मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसने जगाला मगरमिठी मारली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन सर्वत्र करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. हा शुकशुकाट देवस्थान परिसरातही पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्याचा परिणाम आंध्र प्रदेशात असलेल्या तिरुपती भगवान वेंकटेश्वर मंदिरातही दिसून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानने टोकण तत्त्वावर १७ मार्चला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी विरोध केला आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.मंदिराच्या बाहेर, भक्तांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी रांगेत उभे राहण्यास नकार दिला गेला आहे. लोकांची संख्या नियमित करून सर्वांना वेळेनुसार दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे.
तिरुपती तिरुमाला देवस्थानचे सीईओ अनिल कुमार सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्राद्वारे टोकन बुक करू शकतात. टोकण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना निर्णयाला सहमती दर्शवून देण्यात आलेल्या वेळेतच दर्शन घेतले पाहिजे. जर तसे न केल्यास भाविकांना दर्शनासाठी दुसरी वेळ देण्यात येणार नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शहरांतील शाळा महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, रात्री उशिरा राज्यातील सर्व मॉल्ससुद्धा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज