मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील ग्रामदैवत व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री केदारेश्वर देवस्थानची ७ एप्रिल ते ९ एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीत साजरी होणारी यात्रा यंदा कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय सरपंच रावसाहेब पाटील व देवस्थान पंच कमिटीच्यावतीने घेण्यात आला आहे.
या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने येतात.दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतु यंदा जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.या विषाणूची लागण होऊ नये म्हणून गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज