मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात लॉकडाऊन घोषित केला असतानाही मुंबई विरार येथून ६९ जण मालट्रकमधून कर्नाटकातील गुलबर्गाला गावाकडे निघाले होते. त्यांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात | घेतले . सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन शासकीय , वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे . कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाऊन केला आहे.
संचारबंदी असल्याने काम बंद झाले , खाण्याचीही सोय होत नसल्याने मुंबईतील कामगारांनी गावचा रस्ता धरला आहे . म्हसवड पोलिसांनी तपासणी नाक्यावर माल वाहतुकीचा ट्रक अडविला . यावेळी तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल ६९ परप्रांतीय असल्याचे निदर्शनास आले . यामध्ये महिला व लहान मुलांची संख्या अधिक होती . हे सर्वजण विरार येथील मजूर असून , गुलबर्गाकडे निघाले होते. या सर्वांना म्हसवड येथील शासकीय वसतिगृहात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज