mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ट्रॅक्टरच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची पेरणी करणार : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
ट्रॅक्टरच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची पेरणी करणार : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात येणार्या काळात विकासाची नांदी पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच  मतदार संघाच्या विकासाची पेरणी करण्यासाठी मला विधानसभेत आपण पाठवावे असे आवाहन अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.ते माचणूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात सकाळी 9 वा.आयोजित केलेल्या प्रचार सभारंभात बोलत होते.

यावेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान आवताडे यांचे आगमन झाल्यानंतर मंगळवेढा-सोलापूर रोडवरील श्रीकृष्णाच्या मठापासून ते सिध्देश्वर मंदिरा पर्यत त्यांनी स्व:ता ट्रॅक्टर चालवत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

पुढे बोलताना ते म्हणाले की,मतदार संघातील प्रलंबित विकास कामासाठी व बेरोजगारी संपण्यासाठी ही निवडणूक मी लढवत असून या माध्यमातून मला मतदार संघात विकासाची गंगा आणायची आहे. 20-25 वर्षात या मतदार संघात कोणतेही ठोस काम झाले नाहीत.परंतु हे नेते मंडळी आपापसात भांडत बसली असून मतदार संघाच्या विकासाचे न बोलता हे मतदार संघाची दिशाभूल करत आहेत.मला सुरवातीला शेतकरी,कष्टकरी,आरोग्य, पाणी,शिक्षण व पंढरपूर शहरातील अशांतता हे प्रश्न प्रामुख्याने सोडवायचे आहेत.त्यामुळे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासाची पेरणी करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असेही आवाहन शेवटी आवताडे यांनी केले.

विठ्ठल शुगरचे माजी संचालक शेखर भोसले,दत्तात्रय जमदाडे, ब्रम्हपुरीच्या डाॅ.वृषाली पाटील,अमोल माने,चि.यशराज नांदे,

लाडीक डोके,विलास सरवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष अमोल माने,बठाण सेवा सोसायटीचे चेअरमन सुब्राव बेदरे,माजी सरपंच विकास बेदरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  गौडाप्पा पाटील, यांनी समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत आवताडे गटात प्रवेश केला.

यावेळी समाज कल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण,मार्केट कमिटीचे माजी चेअरमन विष्णूपंत आवताडे, पंचायत समितीचे सभापती प्रदिप खांडेकर, दामाजी शुगरचे व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी,मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथआवताडे,शिवसेना माजी तालुकाप्रमुख येताळा भगत,शिवसेना माजी तालुकाप्रमुख गणेश गावकरे,जि.प सदस्य दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य मंजुषाताई कोळेकर,

ब्रम्हपुरीचे माजी सरपंच विजयसिंह पाटील,बठाणचे प्र.सरपंच बिभीषण बेदरे, माचणूरचे माजी सरपंच सुनिल पाटील,माजी उपसरपंच जालिंदर डोके,दामाजी शुगरचे सचिन शिवशरण,

राजीव बाबर,सुरेश भाकरे,भारत निकम,एकनाथ जगताप,लेबर फेडरेशनचे संचालक सरोझ काझी,चंद्रकांत पडवळे,दामाजी नगरचे अॅड.दत्तात्रय तोडकरी,रहाटेवाडीचे सरपंच गोपाळ पवार,माचणूरचे माजी उपसरपंच विलास डोके,खंडू खंदारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिगंबर यादव,सुत्रसंचालन अशोक उन्हाळे तर आभार सचिन शिवशरण यांनी मानले.

त्यानंतर ब्रम्हपुरी येथे समाधान आवताडे यांचा प्रचाराची काॅर्नर सभा संपन्न झाली.यावेळी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील यांनी समाधान आवताडे यांचा सत्कार केला. मुरलीधर पुजारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी दामाजी शुगरचे संचालक राजनभैय्या पाटील, माजी सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच आण्णासाहेब पाटील,प्रताप पाटील, दत्तात्रय पुजारी, माणिक कोळी, ज्ञानोबा कोकरे, माजी उपसरपंच अनंत पाटील यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
लक्ष्मणराव ढोबळेंनी पाणी प्रश्न मार्गी न लावता १२५ संस्था नावावर केल्या : आमदार भारत भालके

लक्ष्मणराव ढोबळेंनी पाणी प्रश्न मार्गी न लावता १२५ संस्था नावावर केल्या : आमदार भारत भालके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर

March 7, 2026
जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

March 7, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा