मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत मंत्रिमंडळ समितीत चर्चा होईल, असे सांगत मुस्लीम आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषित केले. ”सात मार्चला मी अयोध्येत राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जातो आहोत. देवाला जाण्यावर कोणाचे बंधन कसे असेल, उलट ज्यांना ज्यांना आमच्याबरोबर यायचे असेल त्यांनी जरूर यावे,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा नुकतीच केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज वेगळी भूमिका घेतली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही यासंबंधात निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनआरसी कायद्याबाबतही संयुक्त समितीत चर्चा होईल, मग भूमिका ठरेल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज