मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बस-टेम्पोची सामोरा-समोर जोरदार धडक होऊन झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन्ही चालक व एक प्रवाशी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात टेंभुर्णी-अहमदनगर महामार्गावर फुटजवळगाव जवळ शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक- सोलापूर (क्र-एम.एच-११बी.एल-९४१५) ही प्रवाशी बस सोलापूरकडे जात होती. तर टेम्पो (क्र-जी.जे-२०एक्स-१३७१) हा कोईमतूर येथून पालनपूरकडे (गुजरात) जात होता. शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही वाहने फुटजवळगाव (ता.माढा) येथे आली असता त्याची समोरा-समोर जोरदार धडक झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज