मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना बाहेर जाण्यास मनाई आहे . अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ खेळाडू लोकेश राहुल घरात राहून स्वत : ला फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत आहे . राहुलने सोशल मीडियावर आपला ४१ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल आपल्या घरातील छतावर व्यायाम करीत मेहनत घेताना दिसत आहे.
Energizing‼️ ( indoors )
????️????️???? pic.twitter.com/dpJtQhEGBg— K L Rahul (@klrahul11) March 25, 2020
राहुल सध्या चांगल्या फॉर्मात असून , त्याने न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय व टी – २० क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली . आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद भूषविणार होता ; पण लीग ही १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे . भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब , फिजिओ नितीन पटेल यांनी संघासाठी घरात राहून फिट राहण्याचे कार्यक्रम आखून दिले आहेत. उदाहरण म्हणून गोलंदाजांना असा व्यायाम देण्यात आला आहे की , ज्यामुळे कोअर आणि लोअर बॉडी मजबूत होईल. याचप्रमाणे फलंदाजांनाही असा व्यायाम देण्यात आला आहे . ज्यामुळे त्यांचे खांदे आणि मनगट मजबूत होतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज