mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार लांबण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार लांबण्याची शक्यता



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन उणे प्राधिकार पत्राने (बीडीएस) काढण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात दिली. मात्र, राज्य शासनाने मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचे आदेश दिल्यामुळे पूर्वीचे आदेश मागे घ्यावे लागले.त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात निधीअभावी शालेय कर्मचाऱ्यांची वेतन देयके उशिराने मंजूर होतात. त्यामुळे उणे प्राधिकार पत्राचा वापर करून वेतन देयके मंजूर करण्याचे आदेश कोषागरांना दिले जातात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होण्यासाठी हे सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते. परंतु,शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आता दोन टप्प्यात होणार आहेत. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मार्च महिन्याची पगार बिले 20 मार्च पूर्वी वेतन पथक कार्यालय यांच्याकडे जमा करण्यात आली होती. सादर केलेली बिले ही शंभर टक्के वेतनानुसार काढण्यात आली होती. परंतु, शासन आदेशात नमूद केलेल्या टक्केवारीनुसार आता नवीन पगार बिले काढावी लागणार असून यापूर्वी जमा केलेली पगार बिले रद्द करावी लागणार आहेत. तसेच पुन्हा नव्याने पगार बिले बनवावी लागणार आहेत, अशी माहिती वेतन विभागाशी चर्चा केल्यानंतर समोरे आली आहे.

शिक्षकेतर संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर म्हणाले, राज्यभरात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक व लिपिक यांना घरी बसून पुन्हा नव्याने वेतन देयके बनवणे अवघड आहे. तसेच 14 एप्रिलनंतर बिले तयार करून वेतन पथक कार्यालयात जमा करण्यास किमान दहा ते पंधरा दिवस लागू शकतात. त्यामुळे राज्यभरातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन विलंबाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनासारख्या कठीण प्रसंगी राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी शासनासोबत आहेत. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन लवकरात लवकर होईल, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शाळांची फेब्रुवारी महिन्यातील वेतन देयके अजूनही जमा झालेली नाहीत. शासनाच्या या नवीन आदेशानुसार वेतन देयके देण्यास अधिक विलंब होण्याची शक्यता आहे.परिणामी सर्व कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जावे लागेल. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पगार बिलात शासन आदेशानुसार नमूद टक्केवारीनुसार कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करावी,अशी विनंती शिक्षकेतर संघटनेचे राज्य सरकार्यवाह  शिवाजी खांडेकर व पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोतूळकर यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSanskrutik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनाच्या धास्तीने 9 विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली

कोरोनाच्या धास्तीने 9 विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा