मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर येथील अशोक कोडम या नावाच्या युजर नेम असलेल्या फेसबुक अकांउटवरुन मुस्लीम महिलांच्या शाहीन बाग येथील आंदोलनावरुन आक्षेपार्ह पोस्ट फेसबूकवरुन व्हायरल करण्यात आली . याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला यांनी जोडभावी पोलिसांत धाव घेतली . त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अल्ताफ सलिम शेख यांच्या मोबाइल क्रमांकावरुन फेसबूक अकांउट उघडले . दि . ६ मार्च रोजी सायंकाळी ५ . ३८ वाजता अशोक कोडम या नावाचा युजर नेम असलेल्या व्यक्तीच्या फेसबूक अकाउंटवरुन ‘ दिनभर शाहीन बाग मे चराने के बाद भैसों को घर ले जाता एक मासूम किसान ‘ अशी वादग्रस्त पोस्ट दिसून आली . त्यानंतर रेश्मा मुल्ला यांनी भावाच्या मोबाईलवरील वादग्रस्त पोस्ट घेवून जोडभावी पोलिस ठाणे गाठले.
मुस्लीम समाजावरील त्या आक्षेपार्ह पोस्टवरुन मुस्लीम समाजाच्या महिलांसह मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . त्यानुसार पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज