मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । jioला टक्कर देण्यासाठी वोडाफोन-आयडिया कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी तीन धमाकेदार प्लान लाँच केले आहेत. या प्लानमधून jio आणि Airtel ग्राहकांच्या प्लानपेक्षा दुप्पट फायदा मिळेल असा दावा वोडाफोन-आयडिया कंपनीनं केला आहे. सर्व प्लानमध्ये 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय आणखी काही सेवा देण्यावर वोडाफोन कंपनीचा विचार सुरू आहे. त्यामुळे खिशाला परवडणारा आणि नवा वोडाफोन कंपनीचा हा बेस्ट प्लान काय आहे जाणून घेऊया.
249 रुपये वाला प्लान
या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये प्रतिदिवशी 1.5 GB डेटा यासोबत ऑफर सुरू असल्यास अधिक 3 GB ज्यादा डेटा मिळणार आहे. 28 दिवसांत एकूण 84 GB डेटा मिळणार आहे.
399 रुपयांचा प्लान
यामध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता आणि यासोबत प्रतिदिन 3 GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवशी 100 SMS ची सेवाही उपलब्ध आहे. यासोबतच वोडाफोन प्ले, Zee5 अॅपचं सबस्क्रिब्शन मिळणार आहे.
599 रुपयांचा प्लान
वोडाफोन युझर्ससाठी हा प्लान सर्वात बेस्ट आहे असा दावा कंपनीनं केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. दरदिवशी 3 GB डेटा उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवशी 100 SMS उपलब्ध होणार आहेत. कंपनीकडून प्रिमियर अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज