मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
चीनच्या एका व्यक्तीने पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी खास मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये या व्यक्तीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. मला केलेल्या सहकार्याबद्दल तसंच डॉक्टर आणि नर्सने दिलेल्या वैद्यकीय सुविधांबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशा आशयाचा हा मेसेज लिहिण्यात आला आहे.
हा 31 वर्षीय चीनचा नागरिक पुण्यातील नायडू रूग्णालयात दाखल होता. दिल्ली-पुणे विमान प्रवासादरम्यान त्याला उलटीा झाल्याने त्याला कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला मंगळवारी घरी सोडण्यात आलं.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती अर्थशास्त्र पदवीधर असून पर्यटनासाठी भारतात आला होता.
या व्यक्ती त्याच्या मेसेज मध्ये लिहितो, “भाषा समजत नसल्याने मला थोडी भीती वाटत होती. मात्र या ठिकाणी प्रत्येकाने मला मदत केली. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील मी आभार मानतो. खाणं, स्वच्छता, उपचार, नर्सिंग काळजी इतकी उत्तम होती की मी विलगीकरण कक्षात भरती आहे, असे माला वाटलेच नाही.”
पुण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले होते. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जाण्यापूर्वी त्याने सर्व वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
12 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30,442 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 177 प्रवासी आले आहेत.
18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात गुरुवारपर्यंत 43 जणांना भरती करण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 42 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्यातील एन आय व्हीतून दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल.एकूण भरती झालेल्या 43 प्रवाशांपैकी 42 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 1 जण नायडू रुग्णालयात भरती आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज