मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर झेडपी सभेने समाजकल्याण विभागाने मंजूर केलेली हायमास्टची निविदा रद्द केल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे .
झेडपीच्या २१ नोव्हेंबरच्या सभेत समाजकल्याण विभागाच्या हायमास्टचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय | घेतला . समाजकल्याण विभागाने एकत्रित टेंडर काढून परस्पर निविदा मंजूर करून वर्कऑर्डर देण्याचा केलेला प्रयल वादग्रस्त ठरला . त्यामुळे सभेने हे टेंडर रद्द केले .
या निर्णयाविरुद्ध टेंडरमध्ये भाग घेतलेल्या लातूर येथील भारत विद्युत कारागिरी या संस्थेने वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस . एम . कनकदंडे यांच्या न्यायालयात मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याविरोधात विशेष दावा दाखल केला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज