मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
इंद्रजीत साळुंखे यांच्या कुटुंबाला मातोश्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय घोडके यांनी 7777 रुपयांची आर्थिक मदत केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात अतिउत्साहाने जल्लोष करताना इंद्रजीतला ह्दयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला होता.
रोपळे येथे शेतकरी कुटूंबात वाढलेला इंद्रजीत हा कडवा शिवसैनिक होता मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याने, इंद्रजीत उध्दव ठाकरे यांच्या मुंबईस्थित शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता.
शिवतीर्थावरील सोहळ्यात उध्दव ठाकरे शपथ घेण्यासाठी उठले आणि डायसकडे चालू लागले तेंव्हा अति आनंदाने इंद्रजीत जल्लोष करीत आणि घोषणा देत व्यासपीठाकडे धावत सुटला, व्यासपीठाकडे पोहचण्यापुर्वी इंद्रजितला बेशुद्ध होऊन कोसळला.
इंद्रजीत कोसळल्याने सोहळ्याच्या ठिकाणी काहीशी धांदल उडाली मात्र मुंबईस्थित शिवसेनेच्या नेत्यांनी आणि आमदारांनी इंद्रजीतला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वी इंद्रजितचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
इंद्रजितच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना समन्वयक संजय घोडके यांनी मयत इंद्रजीतच्या मुलीच्या शैक्षणिक खर्चासाठी 7777 रुपयांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी इंद्रजीतची पत्नी राणी, उमा घोडके, केशर रितोंड आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज