मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पती निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या पाचव्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली. येथील शिवाजी सदाशिव पाटील (वय 45) यांचे मंगळवारी (ता. 18 ) निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 20) झाले.
पतीच्या निधनाचा धक्का लता शिवाजी पाटील (वय 38) यांना बसला. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने लता यांना खासगी दवाखान्यात हलवले; पण नियतीच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता. मानसिक धक्क्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने लता यांना माहेरी पणुत्रे (ता. पन्हाळा) येथे आणले. मुलगा राहुल व मुलगी सुवर्णा आईला पाहायला पणुत्रे येथे गेले होते.
मुलगा व मुलीचा आवाज कानावर पडताच लता यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. आणि त्यांना प्राण सोडला. शानिवारी (ता. 22) दुपारी अडीच-तीनची वेळ काळ बनून आली. वडिलांचे मृत्युचे दुःख पचवायची ताकद नसलेल्या राहुलवर आईचे दुःख पचवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लता यांचे रक्षाविसर्जन सोमवारी (ता. 24) आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज