मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
औरंगाबाद येथील वोक्हार्ट रिसर्च सेंटर येथील संशोधन केद्रात कार्यरत असलेले संशोधक भारत भगवान काशिद यांना रसायनशास्त्र विषयातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
श्री. भारत काशिद यांना डॉ. ए.ए. घनवट सहयोगी प्राध्यापक रसायनशास्त्र संकुल, सोलापुर विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली “स्टजीज ऑन डिजाइन, सिंथेसिस कॅरेक्टराजेशन ॲन्ड बायोलॉजिकल इव्हॉल्युवेशन ऑफ सम फारम्पॅस्युटिकल्स इंम्पॉरटंट हेटरोसायकलीक मॉलीक्युल्स” या विषयावर संशोधन केले.
३ जानेवारी २०२० रोजी सोलापुर विद्यापीठ, सोलापुर येथे केलेल्या संशोधन कार्यावर खुले सादरीकरण घेण्यात आले. या सादरीकरणासाठी चेअरमन म्हणून प्रा.डॉ. आर. बी. भोसले रसायनशास्त्र विभागप्रमुख उपस्थीत होते. परिक्षक म्हणुन प्रा.डॉ. रामकृष्ण भट (IISER, Pune) उपस्थीत होते.
या खुल्या सादरीकरणासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. औरंगाबाद येथील वोक्हार्ट रिसर्च सेंटर मधील संशोधन केंद्रातील संशोधन विभागप्रमुख डॉ. ए.वाय.मेरवाडे, डॉ. मुबारक शेख, श्री. अमीत पुंड तसेच कृष्णा खोरे विकास मंडळाचे वरिष्ठ अभियंता श्री. विठ्ठल जाधव होते. त्यांनी पीएच.डी. संशोधनवरती ७ पेपर्स आंतरराष्ट्रीय निपयतकालीकात ४ पेंटेन्टस आणि ८ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदेमधुन आपले संशोधन सादर केले आहेत. त्यासाठी त्यांचे प्रा. एस.व्ही. लोणीकर, प्रा. डॉ. व्ही.पी. उवाळे, प्रा.डॉ. विशाल कदम, प्रा.डॉ. संजय अंकुशराव, यांनी अभिनंदन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज