मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेल्या झेंड्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज्य निवडणूक आयोग आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
राजमुद्रेच्या वापरावर आयोगाने मनसेला पत्र पाठवत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले . तर , मनसेने मात्र झेंड्याचा विषय आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याची भूमिका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याची तयारी चालवली आहे . मनसेने अलीकडेच हिंदुत्वाचा स्वीकार करीत आपला ध्वज बदलला . चौरंगी झेंड्याच्या जागी शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा ध्वज पक्षाने स्वीकारला .
यावरून संभाजी ब्रिगेड , अखिल भारतीय मराठा महासंघ , जय हो फाउंडेशन या संघटनांनी आक्षेप घेतला . राजमुद्रेचा वापर करू नये , अशी मागणी या संघटनांनी केली होती .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज