मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तहसिल कार्यालयाच्या आवारातून वाळूचा ट्रॅक्टर चोरून नेल्याप्रकरणी ब्रम्हपुरी येथील हणमंत प्रभाकर गोसावी याच्याविरूध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला असून ही घटना दि.7 रोजी सायंकाळी 5.30 वा.घडली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र.एम.एच-09.5798 व बिगर क्रमांकाची पिवळ्या रंगाची डंपींग ट्रॉली दि.7 रोजी सकाळी 7.45 वा.बेकायदा वाळू घेवून जात असताना महसुल खात्याच्या पथकाने त्याला पकडले होते. तो ट्रॅक्टर कारवाईसाठी तहसिल कार्यालयाच्या आवारात आणून लावला होता.
त्याचदिवशी सायंकाळी 5.30 वा.च्या दरम्यान सदरचा सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा 4 लाख रूपये किमतीचा ट्रॅक्टर आरोपी हणमंत प्रभाकर गोसावी याने मुद्दाम लबाडीने चोरून नेला असल्याची फिर्याद सिध्दापूरचे तलाठी विजय एकतपुरे यांनी दिल्यानंतर गोसावी याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नामदेव कोळी करीत आहेत.
यापूर्वी वाळूची मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या वारातून वाहने पळून गेल्याच्या घटना ताज्याअसताना पुन्हा एक ट्रॅक्टर चोरून नेल्यामुळे नागरिकांमधून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज