मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे गणेश गवळी हा गुरुवार दि.२६ मार्च रोजी पहाटे १२.४५ च्या सुमारास संशयितरित्या सापडल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सदर गणेश मधुकर गवळी (वय ३३,रा .गोणेवाडी ता. मंगळवेढा) हा गोणेवाडी गावच्या हद्दीतील परमेश्वर मंदिराच्या शेजारील रोडच्या बाजूस अंधारात काटेरी झाडात संशयितरित्या आढळून आला. व अंधारात आपले अस्तित्व लपवून मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या स्थितीत आढळून आला.
याची फिर्याद पो.कॉ. गणेश सोलनकर यांनी दिली असून गणेश गवळीविरूध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना. राठोड हे करीत आहेत
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज