मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । डेबिट अथवा क्रेेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन, तसेच कॉन्टॅक्टलेस व्यवहार न करणार्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 16 मार्च 2020 पर्यंत एखाद्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन, कॉन्टॅक्टलेस व्यवहार झाला नसेल, तर त्या कार्डची संबंधित सुविधा बंद केली जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेने 15 जानेवारीला याबाबत अधिसूचना जारी केली होती. आपण ही सेवा पूर्ववत सुरु ठेवू इच्छित असाल, तर आपल्याला डेबिट तसेच क्रेडिट कार्डद्वारे 16 मार्चपूर्वी किमान एकतरी ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहार करावा लागणार आहे.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्डधारकाला कोणत्याही व्यवहारासाठी आपले कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता नसते. तो पीओएस मशीनद्वारे संबंधिताला पेमेंट अदा करु शकतो. एका दिवसात पाच कॉन्टॅक्टलेस व्यवहार करता येऊ शकतात. एका व्यवहाराची मर्यादा 2 हजार रुपयांपर्यंत असून, यासाठी रेडिओ फि—क्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्राचा वापर केला जातो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज