मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सौदी अरेबियातून परतलेल्या चौघांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याचे दिलासादायक वृत्त असतानाच सोमवारी याच कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या आणि इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये असलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या २२ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत चौधरी यांनी दिली . सदर महिला इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आली होती.
ती सध्या इस्लामपूर येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये निरीक्षणाखाली दाखल होती . सोमवारी सकाळी तिच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते . त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला . त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २२ झाली आहे . त्यामुळे जिल्हयाला अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे.
दरम्यान , संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच आणखी एका महिलेस कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने धोका कायम असल्याचे समोर आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज