मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे..शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात एनआरआय व्यक्तीने फसवणुकीची तक्रार दाखल केलीये..हे प्रकरण सोन्याचा व्यवसाय करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी संबंधित आहे..या कंपनीचे शिल्पा आणि राज संचालक होते.
मुंबईमध्ये राहणारे एनआरआय व्यावसायिक सचिन जोशी यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये…त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आमिष दाखवत या कंपनीने त्यांची फसवणूक केली आहे…त्यांच्या तक्रारीनुसार 2014 मध्ये सुरू केलेल्या एसजीपीएलच्या ‘सतयुग गोल्ड स्कीम’ द्वारे त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
जोशी यांनी याप्रकरणात केवळ राज आणि शिल्पा यांच्या विरोधातच नव्हे तर इतरही काही व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केलीये…मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये शिल्पा आणि राज यांच्या व्यतिरिक्त गणपती चौधरी, मोहम्मद सैफी सारख्या अनेक एसजीपीएल अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे…यावर पोलिसांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलंय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज