मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जेसीबी यंत्र विक्री करण्याच्या बहाणा करुन दाम्पत्याने एका तरुणाला तब्बल चार लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– तुकाराम उर्फ बापू खांडेकर व पूनम तुकाराम खांडेकर दोघेही (रा. मेरुधर सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय राजाराम सपकाळ (वय 43, रा. चांढवे, महाड, रायगड) यांनी फिर्याद दिली. ही घटना 2018 ते 2020 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपकाळ हे मूळचे रायगड जिल्ह्यातील चांढवे गावचे रहिवाशी आहेत.त्यांना व्यवसायासाठी जेसीबी यंत्र खरेदी करायचे होते. त्यानुसार त्यांनी ओएलएक्स बेवसाईटवरुन माहिती घेऊन तुकाराम खांडेकर याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खांडेकरने सपकाळ यांना व्यवहारासाठी कात्रज -कोंढवा रस्त्यावरील रॉयल ऍटो फायनान्स कार्यालयात बोलाविले. तेथे त्यांच्यात जेसीबी खरेदीचा व्यवहार 15 लाख रुपयांना ठरला.
त्यावेळी खांडेकर याची पत्नीही उपस्थित होती. त्यानुसार सपकाळ यांनी खांडेकर यास 50 हजार रुपये रोख दिले. त्यानंतर साडे तीन लाख रुपये बँकेतून आरटीजीएसद्वारे खांडेकरच्या बँक खात्यात वर्ग केले. आगाऊ रक्कम दिल्यानंतर सपकाळ यांनी त्यांच्याकडे जेसीबी यंत्राची मागणी केली.
मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सपकाळ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. चव्हाण करीत आहेत
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज