मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपुर – पुणे पालखी महामार्गावर १ फेब्रुवारी रोजी सकाळी झालेल्या कार आणि सिमेंट मिक्सर कंटेनर च्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
१ फेब्रुवारी रोजी होंडा सिटी कार गाडी ( एम . एच . १३ , सी . जी . ५५९९ ) ही कार माळशिरस दिशेने निघाली असता याचवेळी माळशिरसकडून वेळापूरच्या दिशेने निघालेला अशोक लेलँड कंपनीचा सिमेंट मिक्सर ट्रक ( एम . एच . ९ , बी . सी . २०९९ ) या दोन्ही वाहनांचा खंडाळी फाट्याजवळ अपघात झाला होता . यामध्ये शिवराज नागेश फलफले , दीनानाथ ऊर्फ बाबासो नागेश फलफले , वनिता शिवराज फलफले , उत्कर्ष शिवराज फलफले , सह्याद्री बाबासो फलफले , पार्वती महादेव फलफले ( सर्वजण रा . वैराग ) ठार झाले होते .
तर पूजा दीनानाथ फलफले , उत्कर्षा शिवराज फलफले आदी गंभीर जखमी झाले होते . या अपघातानंतर आरोपी ट्रक चालक अन्सारी हा पळून गेला होता . दि . ६ फेब्रुवारी रोजी चालक कशिश मोहम्मद अन्सारी याला झारखंड राज्यातील इटको , पोष्ट बिसरामपूर , जिल्हा पलमु येथून अटक केली . यानंतर रविवार दि . ९ फेब्रुवारी रोजी माळशिरस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने कशिश मोहम्मद अन्सारी याला १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज