मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वेळापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडून गर्दी जमवल्याने कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्री सव्वानऊच्या सुमारास वेळापूर गावात पालखी मैदानाजवळ सुमित्रानगर येथे सिकंदर दादामिया कोरबू,रमजान लाडोबा नदाफ,हसेन शेख (तिघे रा .वेळापूर,ता.माळशिरस) यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोकांची गर्दी जमवून जश्ने ख्वाजा गरीब नवाज कॉन्फरन्स असे बोर्ड लावून जाहीरपणे जेवणाचा कार्यक्रम केला म्हणून मंडलाधिकारी विलास रणसुभे यांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली.
याप्रकरणी वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज