मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून लावण्यात आलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेली आहे.याबाबत मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर व मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून आणण्यात आलेली वाहने लावलेली आहेत.
यातील एम.एच १३ बी.आर ५२०३ या क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रेलरसह तसेच एम.एच १३ सी.एफ ५०२४ ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलिसांची परवानगी न घेता पोलीस कामात व्यस्त असताना चोरून नेल्याची फिर्याद महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनिका वाघे यांनी दिली असून अज्ञात चोरांविरोधात भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.
मंगळवेढा पोलीस स्टेशनला कंपाऊंड नसल्यामुळे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी जेसीबीच्या साह्याने चारी खोदली होती त्यामुळे वाहने पळून जाण्यास अटकाव झाला होता मात्र काही महिन्यांपूर्वी एका बहाद्दराने चक्क खोदलेले चारी मुजवून शासकीय गोडाऊन च्या समोर रस्ता केल्याने वाहने पळून जाण्यास चोरटा मार्ग तयार झाला आहे.याचाच वापर वाहने पळवून नेण्यास केला जात असल्याने तो मार्ग तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज