मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे गेल्या सात महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारीच उपलब्ध नाही.त्यामुळे 26 जानेवारीची ग्रामसभा ग्रामविकास अधिकाऱ्याविनाच पार पडली.
बोराळे ग्रामपंचायतीला ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने गावातील अनेक विकासकामांना खीळ बसत आहे.त्याचबरोबर ग्रामस्थांना हि याचा फटका बसत आहे.तसेच ग्रामसेवकाच्या गैरहजेरी मुळे गावातील अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत त्यामुळे सबंधीत अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बोराळे ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नेमावा अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामसेवक नेमण्यासाठी होतेय राजकारण
गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास अधिकाऱ्याची मागणी करुन देखील जाणून-बुजून या मध्ये राजकारण आणले जात आहे त्यामुळे गावची विकास कामे करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
माधुरी नकाते,सरपंच बोराळे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज