मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना , दिवंगत क्रांती साठे बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे .
यंदा या सोहळ्याचे सातवे वर्ष आहे . या विवाह सोहळ्यात वधू – वरांना कपडे , शालू , चप्पल , सात प्रकारची संसारोपयोगी भांडी व मणी – मंगळसूत्र , जोडवे देण्यात येणार आहे . सर्व नवरदेवाची शहरातील प्रमुख मार्गावरून घोड्यावरून वरात काढण्यात येणार आहे . विवाहासाठी मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असणे आवश्यक आहे , असे संचालक दादासाहेब साठे यांनी सांगितले .
यावेळी नगराध्यक्षा मीनल साठे , महात्मा फले प्रतिष्ठानचे अजिनाथ माळी , मंडळाचे अध्यक्ष उमेश साठे , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन साठे , हनुमंत राऊत , अजिनाथ शहाणे उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज