मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ‘टीम इंडिया’ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर आपला राग काढण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र जीवघेण्या कोरोना व्हायरसचा क्रिकेटप्रेमींनीही धसका घेतल्याने तिकीट विक्रीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आज गुरुवारी होणाऱ्या सलामीच्या एकदिवसीय लढतीत उभय संघांचे रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत होणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धरमशाला स्टेडियम व्यवस्थापन आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन यांनीही सामना बघण्यासाठी येणाऱया क्रिकेटप्रेमींची मैदानाकर विशेष काळजी घेण्याचे ठरकले आहे. ‘विमानतळाकरून येणाऱया प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. स्टेडियममध्ये प्रवेशद्वाराजवळ 10 डॉक्टरांची टीम सज्ज असणार आहे. लेझर थर्मामीटरच्या माध्यमातून प्रत्येकाची चाचणी होणार आहे. ज्यांना ताप आला असेल त्यांची तातडीने तपासणी केली जाईल.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीसाठी आपले वैद्यकीय पथक सज्ज केले आहे. क्रिकेट संघाच्या निवासाची व्यवस्था असलेले हॉटेल, विमानसेवा व वैद्यकीय पथक या सर्वांना आपापल्या सेवा पुरविण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज