मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे रविवारी सकाळी मयत डॉक्टर अनुराधा चा पती श्रीशेल बिरादार याचा मृतदेह विठ्ठल बिराजदार यांच्या शेतात आढळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. रात्री उशिरा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल आज सोमवारी आला असून या अहवालात श्रीशैल बिरादार यांच्या शरीरात विषाचे अंश आढळून आले आहेत. याशिवाय मृतदेहावर कोणत्याही जखमा नसल्याने श्रीशेल बिरादार याची हत्या की आत्महत्या याबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मृत्यूपूर्वी बनविला व्हिडिओ
मी श्रीशेल बिराजदार बोलतोय, माझी बायको अनुराधा बिराजदार हिला विष देऊन जाळले आहे. जिथे माझ्या बायकोला जाळले आहे. तिथे मला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. विठ्ठल बिराजदार, श्रीदेवी बिराजदार, संजय ,बसू, संतोष, काशिनाथ या लोकांनी मिळून माझ्या बायकोला मारले आहे.आता मला पण मारायला लागले आहेत.आज माझ्या जीवाला बरेवाईट झाल्यास या लोकांना जबाबदार धरण्यात यावे असे व्हिडिओ मध्ये म्हटलेले होते. हा व्हिडिओ बनवून त्याने आपल्या मित्राच्या व्हाट्सअप वर पाठविलेला आहे. दरम्यान त्याच्या आवाजात थरकाप जाणवत होता. या व्हिडिओ चेहरा दिसत नाही. हा व्हिडीओ त्या रात्री 2 वाजून 56 मिनिटांनी मित्राच्या व्हाट्सअप वर पाठविलेला होता.दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी काही जणांना या प्रकरणाच्या तपासकामी चौकशीसाठी बोलावले असून त्यांची दिवसभर कसून चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली.
दरम्यान रविवारी सकाळी कल्लाप्पा पाटील हे शेतात आपली जनावरे घेऊन गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला त्यांनी लगेच पोलिस पाटलांना सांगितले पोलीस पाटलांनी
मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून श्रीशेल बिरादार यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच मृतदेह चे पोस्टमार्टेम सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज